‘झेब्रा क्रॉसिंग’चे पट्टे पुसट

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य रस्त्यावर सिग्नल असलेल्या चौकामध्ये पांढऱ्या रंगाचे “झेब्रा क्रॉसिंग’ पट्टे पुसट झाले आहेत. यामुळे, वाहन चालकांबरोबरच रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांचाही गोंधळ उडालेला पहायला मिळत आहे.

कोणत्याही चौकात सिग्नल यंत्रणा उभी केल्यानंतर वाहन धारकांसाठी “झेब्रा क्रॉसिंग’चे पांढरे पट्टे ही “लक्ष्मण रेषा’ समजली जाते. सिग्नल लागल्यानंतर “झेब्रा क्रॉसिंग’च्या पाठीमागेच वाहनधारकांना आपली वाहने उभी करावी लागतात. “झेब्रा क्रॉसिंग’ पट्ट्यामुळे रस्ता ओलांडणारे नागरिकही सुरक्षित रस्ता ओलांडू शकतात. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेमध्ये “झेब्रा क्रॉसिंग’चे महत्त्व मोठे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अनेकदा “झेब्रा क्रॉसिंग’वर उभ्या असलेल्या वाहनांवर नियमभंग केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांकडून दंड आकारण्यात येतो. त्यासाठी मुख्य रस्त्यावर “झेब्रा क्रॉसिंग’ वाहनधारकांना स्पष्ट आणि दूर वरुनच दिसेल अशी रंगवण्यात आलेली असते. मात्र, सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य रस्त्यावरच्या चौकामधील “झेब्रा क्रॉसिंग’ची लाईन दर्शवणाऱ्या पांढऱ्या रंगाचे पट्टे अतिशय पुसट झाले आहेत. त्यामुळे सिग्नल लागल्यानंतर आपली वाहने कोठे उभी करायची याचा गोंधळ वाहनधारकांमध्ये होत असल्याचे पहायला मिळत आहे.

वाहनधारकांबरोबरच रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांनाही हे पट्टे दिसत नसल्याने त्यांच्यातही संभ्रम झालेला पहायला मिळत आहे. शहरातील आंबेडकर चौक, निगडी, दापोडी या मुख्य रस्त्यावरील अनेक चौकात “झेब्रा क्रॉसिंग’ दर्शवणारे पट्टे पुसट झालेले आहेत. त्यात अनेक ठिकाणी मेट्रोचे काम सुरु असल्याने रस्त्यावर अनेकदा वाहनांची मोठी गर्दी असते, त्यामुळे, काही वेळा गोंधळ उडालेला पहायला मिळत आहे. पुसट झालेले “झेब्रा क्रॉसिंग’चे पट्टे नव्याने रंगवावेत अशी मागणी नारिकांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)