झेडपीतील सांडपाणी उघड्यावरच

सातारा – सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या मागील बाजूस सांडपाणी वाहन करणाऱ्या नलिकेतून शौचालयाचे पाणी उघड्यावरच पडत असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीमागे असलेल्या उपहारगृहाशेजारी ही अवस्था असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. या ठिकाणी असलेल्या वॉश बेसिनशेजारीच ही सांडपाणी वाहन करणारी नलिका तुटली असून उघड्यावरच दैनंदिन स्वरूपात कमी अधिक प्रमाणात पाणी वाहत असल्याचे दिसत आहे.

उपहारगृहामध्ये जेवण,नाष्टा तसेच चहा घेण्यासाठी मोठ्या स्वरूपात नागरिकांची गर्दी असते. जेवण करून हात धुण्यासाठी बाहेर आल्यास कायमच दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. जिल्हा परिषदेच्या सांडपाणी वाहन करणाऱ्या नलिकांची दुरूस्ती यामुळे प्राधान्याने करणे गरजेचे बनले आहे. या ठिकाणी कित्येक दिवस हा प्रकार जैसे थे अवस्थेत राहिल्याने संबधित बाब आधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली कशी नाही ?असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय. या ठिकाणी जिल्ह्यातील कामकाजासाठी नागरिकांची वर्दळ असते. त्यांना देखील या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.स्वच्छ सातारा जिल्हा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या हस्ते सातारा जिल्ह्याचा
गौरव करण्यात आला. मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या कामगिरीमध्ये मैलाचा दगड ठरेल अशीच ही कामगीरी आहे. मात्र त्यांच्या या कार्याला संबंधित विभागाच्या दुर्लक्षाने दिव्याखाली अंधार असल्याचे जाणवत आहे.

उघड्यावर कचरा जाळण्याचे प्रकार
जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारत व परिसरात अनेक ठिकाणी अस्वच्छता असल्याचे दिसत आहे.अनेक ठिकाणी राडा रोडा, तुटके बॅनर, साहित्य, उघडयावर पडून आहे. यामध्ये उघड्यावर कचरा जाळण्यासारखे प्रकार देखील अद्याप घडत आहेत. सातारा नगरपरिषदेच्या माध्यमातून भुयारी गटर योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या सांडपाणी व्यवस्थापनाकरिता सातारा नगर परिषदेच्यावतीने सुयोग्य व्यवस्था केल्यास येथील सांडपाण्याचा प्रश्‍न कायमचा सुटण्यास मदतच होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)