झेडपीच्या कामांवर ‘सर्व्हिस डिलिव्हरी ब्यूरो’ची नजर

दहा जणांची टीम घेणार अधिकाऱ्यांची झाडाझडती

पुणे- जिल्हा परिषदेच्या विकास निधीतून केली जाणारी कामे यासह नागरिकांची विविध प्रकारची कामे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून वेळेत होतात. त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत नाही ना, या सर्व गोष्टींवर आता “सर्व्हिस डिलिव्हरी ब्युरो’ची करडी नजर असणार आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडे एखाद्या विभागाची किंवा अधिकाऱ्याबाबत तक्रार केल्यास त्याबाबत समिती पाठपुरावा करून ते काम पूर्ण करून देणार आणि संबंधीत दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

-Ads-

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावागावांमध्ये विविध विकासकामे होत असतात. तसेच जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचीही अनेक कामे जिल्हा परिषदेकडे असतात. मात्र, अनेकदा नागरिकांना आपले काम पूर्ण करून घेण्यासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागतात. तर, गावागांवतील विकासकामे पूर्ण होण्यास विलंब लागतो. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेतर्फे ही “ब्युरो’ समिती स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेची कामे वेळेत पूर्ण होण्यास काय अडचणी आहेत. तसेच सर्वसामान्य नागरिकांची काही अडवणूक होत आहे का, याचा शोध घेवून संबंधित काम पूर्णत्त्वास नेण्याची जबाबदारी “सर्व्हिस डिलिव्हरी ब्युरो’ पार पाडणार आहे.

हे काम पूर्ण करून देतानाच कामाला विलंब होण्यास जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी जबाबदार आहेत का, याची माहितीही ब्युरो घेणार आहे. हे अधिकारी जर संबंधित प्रकरणात दोषी ठरत असतील तर त्यांच्यावर ब्युरोमार्फत कारवाई केली जाणार आहे.

नागरिकांना उत्तम आणि वेगवान सेवा देणे अपेक्षित आहे. त्यासाठी अधिकारी, कर्मचारी या प्रत्येकाने आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडणे गरजेचे आहे. अनेकदा जिल्हा परिषदांमार्फत राबविल्या जाणाऱ्या किंवा केली जाणारी विकासकामे वेळेत पूर्ण होत नाही. या कामांना विलंब का लागतो, याची कारणेही स्पष्ट होत नाही. त्यामुळे त्यासाठी सर्व्हिस डिलिव्हरी ब्यूरोची स्थापना केली आहे. या ब्युरोच्या माध्यमातून अधिकारी कर्मचाऱ्यांना शिस्त लागणार आहे. तसेच नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होण्यास मदत होणर आहे.

ब्यूरोमध्ये दहा जणांची टीम
जिल्हा परिषदेच्या सर्व्हिस डिलिव्हरी ब्यूरोमध्ये वर्ग एक दर्जाचा अधिकारी, दोन सहाय्यक अधिकारी यांच्यासह दहा कर्मचारी असणार आहेत. नागरिकांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित ठिकाणी जावून ब्यूरो काम करणार आहेत. दरम्यान, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून या ब्युरोच्या कामकाजास सुरूवात होणार आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये नक्‍कीच धास्ती भरली असून, त्याचा फायदा म्हणून कामांना गती मिळण्यास मदत होणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)