झेडपीचे सभागृह नाटकासाठी खुले अतिभव्य हॅम्लेट नाटक होणार सादर

सातारा, दि. 10 (प्रतिनिधी)- सातारा जिल्हा परिषदेने उभारलेले भव्य यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह हे सातारकरांच्या सांस्कृतिक वैभवाचे स्थान आहे. मात्र हे बांधून पूर्ण झाल्यापासून तिथे काही सांस्कृतिक कार्यक्रम वगळता त्याचा वापर होत नव्हता. मात्र, जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी खास ठराव करून हे सभागृह व्यावसायिक नाट्य प्रयोगांसाठी खुले केले असून नाट्यप्रेमींमधून जिल्हा परिषदेचे अभिनंदन होत आहे. या सभागृहात दि. 12 व 13 रोजी सायंकाळी 6 वाजता दोन दिवस 80 कलावंतांच्या संचातील अतिभव्य व अजरामर महानाट्य विल्यम शेक्‍सपिअर लिखित हॅम्लेटचे दोन प्रयोग रंगणार असून नाट्यप्रेमींसाठी खास पर्वणी ठरणार आहे.
सातारा पालिकेचे शाहू कलामंदिरही पालिकेने काही वर्षापूर्वी विविध सुविधा निर्माण करून चांगले केले आहे. मात्र, तेथे व्यावसायिक नाट्य प्रयोगाची संख्या घटली आहे. दोन वर्षापूर्वी बहुचर्चित यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह सर्व सुविधांनी उभारण्यात आले आहे. मात्र, तिथेही भाडे जास्त असल्याने नाट्य प्रयोग लावणे शक्‍य होत नाही. या भव्य सभागृहात नाट्य प्रयोग झाल्यास तिथे निश्‍चितपणे रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळू शकतो. झी मराठीने सादर केलेले हे हॅम्लेट जागतिक दर्जाचं आहे आणि आपल्या जबरदस्त सादरीकरणाने ते रंगभूमी गाजविणार हे नक्‍की ! कोरा करकरीत राजवाड्यांचा सेट, अप्रतिम नेपथ्य, हृदयाचा ठाव घेणारे संगीत आणि सहाशे वर्षे मागे नेणारी वेशभुषा, सगळेच अप्रतिम आणि भारावणारे आहे. चंद्रकांत कुलकर्णी या अवलियानं हॅम्लेटचं कुठेही मराठीकरण न करता, डेन्मार्कची पार्श्‍वभूमी कायम राखत नाटकाचा आशय, आणि संदेश प्रेक्षकांपर्यंत लिलया पोहचविला आहे. याच नाटकाचे दोन प्रयोग यशवंतराव चव्हाण सभागृहात रसिकांना अनुभवता येणार असल्याचे नाट्य व्यवस्थापक बाळू कदम यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)