झेडएफ’च्या मॅनेजर हत्या प्रकरणी मारेकऱ्यांना अटक

वाघोली- पेरणेफाटा येथे झेड एफ कंपनीतील मॅनेजरला मारहाण केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या मॅनेजरच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात लोणीकंद पोलिसांना यश आले आहे. कंपनीत अपमानास्पद वागणूक देत असल्याच्या कारणावरून कंपनीतील तिघांनी इतरांच्या मदतीने मारहाण केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी कट रचणारे तीन कामगार आणि मारहाण करणारे पाच अशा एकूण आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
दिनेश तुकाराम साळुंके (वय 35, रा. दावडी, ता. खेड जि. पुणे), राजेश आसाराम साळवे (वय 42, रा. पॉवर हाऊस, लोणीकंद, ता. हवेली, जि. पुणे, मूळ रा. गुलमोहर रोड, आसरा सोसा. सावेडी, अहमदनगर), व्यंकट नारायण भोस (वय 38, रा. पेरणेफाटा, ता. हवेली, जि. पुणे, मूळ रा. तांदळी धुमाला, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), अक्षय दादाभाऊ ओव्हाळ (वय 19 रा. दावडी, ता. खेड, जि. पुणे), सिध्दार्थ राजेंद्र माघाडे (वय 19, रा. दावडी, ता. खेड जि. पुणे), गणेश पोपट शिंदे (वय 20, रा. दावडी, ता. खेड, जि. पुणे), विशाल अंबर जमादार (वय 20, रा. दावडी, ता. खेड, जि. पुणे), सोमनाथ संदीप नेटके (वय 22, रा. दावडी ता. खेड जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या मारेकऱ्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव भीमा येथील झेडएफ कंपनीमधील मॅनेजर असलम सरदार कोथळी यांना पेरणेफाटा येथेदोन मोटारसायकलवरून आलेल्या सहा जणांनी जबर मारहाण केली होती. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात कोथळी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले होते. तपासादरम्यान असलम कोथळी कामगारांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचे समोर आले. दिनेश साळुंके, राजेश साळवे, व्यंकट भोस या कंपनीतील तीन कामगारांनी मॅनेजर कोथळीला मारण्याचा कट चार महिन्यांपूर्वीच रचला होता. याबाबत पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, उपअधीक्षक सुहास गरुड यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सुचना केल्या होत्या. त्यानुसार लोणीकंद पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या पथकाने गुन्ह्यातील आठ जणांना अटक केली. आणखी एक जण फरार असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत. न्यायालयाने आठ जणांना 2 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास लोणीकंद पोलिस करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)