झूम… झूम… झुंबा

आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष द्यायचे राहून जाते. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी व्यायाम करणे आवश्‍यक आहे. व्यायाम टाळण्याचे मुख्य कारण म्हणजे वेळेचा अभाव आणि कामाचा अधिक ताण. यावर उपाय म्हणून झुंबा डान्स प्रकार भारतात वेगाने रुजत आहे. झुंबा डान्स तुम्ही घरीही करू शकतात. यामुळेच ज्यांना जिममध्ये जाणे शक्‍य होत नाही. त्यांच्यासाठी झुंबा हा उत्तम पर्याय आहे.

झुंबा हा लॅटीन डान्स आणि व्यायाम प्रकार आहे. ज्या देशात हा डान्स प्रकार गेला. तेथील रंग यामध्ये मिसळले गेले. म्हणूनच भारतात बॉलिवूड, मराठी गाण्यावरही झुंबा डान्स केला जातो. संगीत हेच झुंबाच्या आकर्षणाचे केंद्र आहे. संगीतावर पाय आपोआपच थिरकायला लागतात. परंतु, झुंबा डान्स म्हणजे कसेही हात-पाय हलवून केला जात नाही. यामध्ये काही स्टेप्स ठरलेल्या असतात. वजन कमी करणे तसेच नियंत्रित ठेवण्यासाठी तरुणाई झुंबाला मोठ्या प्रमाणावर पसंती देते.

झुंबा डान्सचे फायदे –
– झुंबा डान्समुळे 500-800 कॅलरीज बर्न होतात.
– डान्स करताना दम लागल्याने श्‍वासोच्छ्वास वाढतो. स्टॅमिना वाढतो.
– चयापचयाची क्रिया सुधारते. भूक लागते.
– मूड फ्रेश होतो.
– मानसिक थकवा कमी होतो.
– संपूर्ण बॉडीचे वर्कआउट होते.
– नाचताना घाम खूप येतो आणि शरीरातील नको असलेली द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते
– उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींनाही त्यांच्या प्रकृतीनुसार योग्य सल्ला घेऊन हे व्यायाम करता येतात. या आजारांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम व्यायामांनी काही प्रमाणात कमी करता येतात.

– श्‍वेता शिगवण


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)