झुकरबर्गच्या घरी आणखी एका कन्यारत्नाचे आगमन….

मुंबई: फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गच्या घरी दुसऱ्या कन्यारत्नाचे आगमन झाले आहे. झुकरबर्ग दुसऱ्यांदा मुलीचा पिता बनला आहे. झुकरबर्गनेच फेसबुकवर त्याबाबतची घोषणा केली. त्याने आपल्या पोस्टसोबत फॅमिली फोटो शेअर करुन, ही बातमी चाहत्यांना दिली आहे.

या फोटोत स्वत: झुकरबर्ग, पत्नी प्रिसिला चैन आणि दोन्ही मुली दिसतात. या महिन्याच्या सुरुवातीला मुलीचा जन्म झाल्याने, झुकरबर्ग आणि प्रिसिलाने तिचे नाव ‘ऑगस्ट’ ठेवले आहे.
झुकरबर्गने लाडक्या ‘ऑगस्ट’साठी एक खुलं पत्रही लिहिलं आहे. झुकरबर्ग म्हणतो, “डियर ऑगस्ट, या जगात तुझं स्वागत आहे. तू भविष्यात काय बनशील, याची उत्सुकता मला आणि तुझ्या आईला आतापासूनच लागली आहे. ज्यावेळी तुझ्या बहिणीचा जन्म झाला होता, त्यावेळीही आम्ही असंच जगाबद्दल पत्र लिहिलं होतं. उत्तम शिक्षण, उत्तम जीवन, कमीत कमी आजार, चांगला समाज आणि समानतेच्या जगात तुम्ही मोठ्या व्हा. आम्ही लिहिलं होतं, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे तुमची पीढी आमच्यापेक्षा सरस असेल आणि ते करण्यासाठी आमची तशी जबाबदारी असेल. आम्ही तुमची पीढी आणि भविष्याबाबत प्रचंड आशावादी आहोत.
शेवटी झुकरबर्ग म्हणतो, “बालपण हे जादूसारखं असतं. तुम्हाला ते आयुष्यात एकदाच मिळतं. त्यामुळे हे बालपण भविष्याचा विचार करुन खराब करु नका. तुमच्या पीढीसाठी हे जग आणखी कसं बनवता येईल, यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करु. ऑगस्ट, आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझ्या सुखी आणि आनंदी आयुष्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. तुझ्याकडून आम्हाला असंच प्रेम मिळेल अशी अपेक्षा”

तुझेच आई-बाबा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)