झुंबड… कांदा अनुदानासाठी !

नगर बाजार समितीत तीन हजार शेतकऱ्यांची नोंदणी

नगर:  राज्य सरकारने कांद्यासाठी जाहीर केलेल्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अनुदानाचे अर्ज भरून देण्यासाठी सोमवारी (ता. 7) नगर बाजार समितीत मोठी गर्दी केली होती. यावेळी आमदार शिवाजी कर्डिले यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करत अडचणी समजून घेतल्या.

राज्य सरकारने 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत बाजार समितीत विकलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल 200 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुदानाचा लाभासाठी कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेण्यात येत असून 15 जानेवारीपर्यंत अर्ज भरून देता येणार आहेत. सोमवारी (दि. 7) अनुदानाचे अर्ज भरून देण्यासाठी कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी बाजार समितीत मोठी गर्दी केली होती. आत्तापर्यंत 3 हजार अर्ज भरून देण्यात आले आहेत. शेतकरी बाहेर गावावरून येत असल्याने त्यांना बाजार समितीत काही अडचणी येतात का, याचीही आमदार कर्डिले यांनी सोमवारी पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली.

अनुदानाचे अर्ज भरण्यासाठी बाहेरगावावरून येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बाजार समितीत त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली असल्याची माहिती यावेळी आमदार कर्डिले यांनी दिली. शेतकऱ्यांनी शासनाच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी मुदतीत अर्ज भरुन घ्यावेत, असे आवाहन आमदार कर्डिले यांनी केले. सभापती विलास शिंदे, संदिप कर्डिले, कानिफनाथ कासार, बाळासाहेब निमसे, सचिव अभय भिसे आदी उपस्थित होते


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)