‘झील झीबाकार’मध्ये रक्तदान शिबीर संपन्न

पुणे : झील एज्युकेशन सोसायटीच्या झील इन्स्टिटयुट आॅफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन, काॅम्प्युटर अॅप्लीकेशन अॅण्ड रिसर्च या महाविद्यालयातर्फे आज (सोमवारी) रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्रेयष जोशी, मॅनेजिंग डायरेक्टर, सेलर गारेपा इंडीया प्रा. ली. व महाविद्यालयाचे संचालक डाॅ. अमोद मरकळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

डाॅ. अमोद मरकळे यांनी अक्षय ब्लडबॅंकचे डाॅ. विनोद गांधी यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले व रक्तदानाविषयी माहिती देवुन रक्तदानाचे महत्व विषद केले. महाविद्यालयातर्फे दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. 60 हून अधिक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यानी  शिबिरामध्ये स्वेच्छेने सहभाग घेतला. संस्थेचे संस्थापक . संभाजीराव काटकर, कार्यकारी संचालक प्रा. जयेश  काटकर, कॅम्पस डायरेक्टर डाॅ. संजय देवकर यांच्याकडून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यास मोलाचे मार्गदर्शन  मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)