“झिल 2018-19’चे विजेतेपद “ग्रिन फिंगर्स’ने पटकावले

अकलूजमध्ये आयोजित कला-क्रीडा स्पर्धांचा समारोप समारंभ उत्साहात

अकलूज- शंकरनगर येथील शिवरत्न नॉलेज सिटी आयोजित झिल 2018-19 चे सर्वसाधारण विजेतेपद ग्रिन फिंगर्स कॉलेजने पटकाविले.
खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त झिल 2018-19 या वार्षीक कला-क्रीडा स्पर्धेचा समारोप स्मृतिभवन येथे करण्यात आला. या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद ग्रीन फिंर्गस कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऍण्ड टेक्‍नॉलॉजी या कॉलेजने पटकावला असून, द्वितीय क्रमांक राजसिंह मोहिते पाटील मॅनेजमेंट स्टडीजने, तर तृतीय क्रमांक मदनसिंह मोहिते पाटील सायन्स कॉलेज – मंगळवेढा यांनी मिळविला. विजेत्यांना अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील यांचे हस्ते गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक मंडळ, सर्व कर्मचारी आणि हजारो विद्यार्थी उपस्थित होते,
झिल 2018-19 अंतर्गत बुद्धिबळ, वाद-विवाद, रांगोळी, ग्रीटिंग, मेंदी, क्रिकेट, हॉलीबॉल, कबड्डी, बॅडमिंटन, ट्रेझर हंट, मड हंट, मोबाइल फोटोग्राफी, पेपर प्रेझेंटेशन, जाहिरात क्रिएटिव्हिटी, प्रोजेक्‍ट प्रेसेंटेश, लोकनृत्य, बॉलीवूड डान्स, थीम डान्स, सोलो सिंगिंग, फॅशन शो आदी स्पर्धा घेण्यात आल्या.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)