“झिरो’मध्ये सलमान-शाहरुखची जबरदस्त केमिस्ट्री

बॉलीवूडचा किंग अर्थात शाहरूख खान सध्या त्याच्या आगामी “झिरो’ चित्रपटातील विशेष भूमिकेमुळे खूपच चर्चेत आहे. त्यातच आता ईदजवळ दोन दिवसांवर आली असून त्याच्या फायदा घेण्यासाठी शाहरूखने या चित्रपटाचा टिझर प्रदर्शीत केला आहे. यात सलमान-शाहरूखची जबरदस्त केमिस्ट्री दिसून येते.

शाहरूख खानचा “झिरो’ चित्रपट त्याच्या वेगळ्या विषयामुळे सुरूवातीपासूनच प्रसिद्धीच्या झोतात आहे. यात शाहरूख एका बुटक्‍या व्यक्‍तीची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानही या चित्रपटात काम करणार असल्याची चर्चा होती. आता या चित्रपटाचा टिझरही प्रदर्शित झाला असून यात सलमान-शाहरूख यांची जबरदस्त केमिस्ट्रीपाहून प्रत्येकजण अचंबीत होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शाहरूखने आपल्या ट्‌विटर हॅंडलवरून याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्या खाली लिहिले की, “ये लो ये लो… आनंद एल. रॉयकडून यंदाची ईद खूपच गोड आहे. माझ्याकडून “झिरो’च्या टिम आणि आपणा सर्वांना ईदच्या शुभेच्छा.’ या टिझरमध्ये ठेंगण्या शाहरूख खानच्या पाठीमागे सलमान खान उभा असताना दिसतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल. रॉय यांनी केले असून डिसेंबर महिन्यात चित्रपट प्रदर्शीत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)