“झिरो’तील बुटका शाहरुख आता ट्‌विटरवर 

बॉलिवूडमध्ये बहुतेक सेलिब्रिटी आपापल्या ट्‌विटर अकाउंटवर ऍक्‍टिव्ह असतात. त्यांन आपल्या फॅन्सशी कनेक्‍टेड राहण्यासाठी ते एक चांगले माध्यम आहे. ट्‌विटरवर स्वतःच्या नावाने परिचित राहणेच हे सेलिब्रिटी पसंत करतात. मात्र क्वचित एखादा कोणी तरी आपल्या आवडत्या व्यक्तिरेखेच्या नावानेही अकाउंट उघडतो. हा दुसरा तिसरा कोणी नाही, तर शाहरुख खान आहे.

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला बॉलिवूडचा ‘किंग खान’ म्हणजेच शाहरूखचा ‘झिरो’ हा चित्रपट येणार आहे. शाहरूख या चित्रपटाबाबत फारच उत्साहीत दिसून येत आहे. तो या चित्रपटात एका बुटक्‍या व्यक्तीचे पात्र साकारत आहे. ‘बव्वा सिंग’ असे त्याचे नाव आहे. शाहरूखने त्यामुळे याच पात्राच्या नावाने ट्‌विटरवर अकाऊंट सुरू केले आहे.
ट्‌विटरवरून शाहरूखने ‘बव्वा सिंग’ म्हणून प्रेमळ धमकी देखील दिली आहे. दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी देखील त्याच्या पहिल्या ट्‌विटचे स्वागत केले आहे. या ट्‌विटर अकाऊंटवरून शाहरूखने चाहत्यांना ‘बव्वा सिंग’ची ओळख करून दिली आहे. त्यासोबतच त्याने ट्‌विटरवाले तयारीत राहा, बव्वा सिंग आला आहे असे लिहिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिग्दर्शक आनंद एल. राय आणि शाहरूख ‘झिरो’ चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सोबत काम करत आहेत. या चित्रपटात शाहरूख सोबत कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा या देखील झळकणार आहेत. 21 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)