“झिरो’च्या रोलसाठी कतरिनाला रडावे लागले

एकाच सिनेमात जर दोन हिरोईन असतील तर दोघींमध्ये काही तरी बेबनाव होणे, कॅटफाईट होणे ही अगदी स्वाभाविक आहे. बॉलीवूडमध्ये ही गोष्ट काही नवीन नाही. “झिरो’मध्ये कतरिना आणि अनुष्का शर्मा या दोघीजणी आहेत. त्यांच्यात अशी कॅटफाईट झाली नाही. पण अनुष्काच्या रोलसाठी कतरिनाला अक्षरशः रडायला लागले आहे. डायरेक्‍टर आनंद एल राय यांनी स्वतः याचा खुलासा केला आहे.

या सिनेमाची कथा सर्वप्रथम कतरिनाकडे आली होती. स्क्रीप्ट तर तिला आवडली आणि तिने काम करायची तयारीही दर्शवली. पण जेव्हा अनुष्काची निवड झाली तेव्हा तिला कोणता रोल दिला गेला हे समजल्यावर मात्र कतरिनावर रडायची पाळी आली. कारण जो रोल कतरिनाला आवडला होता, तोच अनुष्काला दिला गेला होता. आनंद एल. रॉयनी तिला सांगितले होते की “झिरो’मध्ये सर्वांत ताकदवान रोल तुझाच असणार आहे. मात्र त्यांनी तिला कोणता रोल दिला जाणार हे सांगितले नव्हते. त्यामुळे कतरिनाचा विरस झाला. तिने अनुष्काचा रोल मिळवण्याचा प्रयत्नही केला. पण आनंद एल. रॉय यांनी कतरिनाचा रोल बदलला नाही. शूटिंगच्या वेळी जेव्हा अनुष्काला तिच्या रोलमध्ये कतरिना बघायची तेव्हा तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागायचे. तिला स्वतःचा रोल आवडला होता. पण अनुष्काला दिलेल्या रोलवर तिचा जीव जडला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कतरिनाला अल्कोहोलच्या आहारी गेलेल्या स्टारचा रोल मिळाला आहे. तिच्या रोलमध्ये जीव ओतण्याचे काम तिने अगदी परफेक्‍ट केले आहे. अल्कोहोलचे अतिसेवन केलेल्या लिझा मिनेली, डेमी मूर आणि लिंडसे लोवान या हॉलीवूड स्टारना तिने डोळ्यासमोर ठेवले होते. या तिन्ही अॅक्‍ट्रेसच्या जीवनकथा तिने वाचून काढल्या. त्यांच्या अनुभवांच्या आधारे तिने स्वतःच्या रोलमध्ये जिवंतपणा आणला. डेमी मूरच्या आयुष्यातला नैराश्‍याचा कालखंड तिने कसा घालवला याचा, अभ्यासच कतरिनाने केला. व्यसनाधिनतेचे दुष्परिणाम आणि त्यातून स्वतःला सावरण्याच्या सकारात्मक अनुभवांच्या कथा असलेली अनेक पुस्तकेही तिने वाचून काढली. पण तरिही तिला अनुष्काच्या रोलचा हेवा वाटतो आहेच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)