झिम्बाब्वेचे राजन नायर 20 वर्षांसाठी निलंबित

झिम्बाब्वे : झिम्बाब्वे क्रिकेट संघटनेचे माजी पदाधिकारी राजन नायर यांच्यावर सर्व प्रकारच्या क्रिकेटकरिता 20 वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय आयसीसीने आज जाहीर केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने “फिक्‍स’ केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. नायर यांच्यावर तीन आरोप सिद्ध झाले असून त्यात झिम्बाब्वेचा कर्णधार ग्रॅमी क्रेमरला 30 हजार डॉलर्सची लाच देऊ केल्याचाही समावेश आहे.

क्रेमरने स्वत:च या घटनेची शहानिशा केली होती. तसेच मॅचफिक्‍सिंगसाठी इतक्‍या उघडपणे कोणी आपल्याशी संपर्क साधेल असे आपल्याला कधीच वाटले नसल्याचेही त्याने म्हटले आहे. त्याचप्रमाणे झिम्बाब्वे विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यात गेल्या वर्षी झालेल्या कसोटी मालिकेचा निर्णय निश्‍चित करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप राजन नायर यांच्यावर आहे. या प्रकरणी साक्ष दिल्याबद्दल आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महाव्यवस्थापक अलेक्‍स मार्शल यांनी क्रेमरचे कौतुक केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)