“झिपऱ्या’ कादंबरीवरील सिनेमा जून महिन्यात रिलीज

विख्यात साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांच्या “झिपऱ्या’ या कादंबरीवर आधारीत “झिपऱ्या’ नावाचा सिनेमा लवकरच येतो आहे. अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर “झिपऱ्या’चा फर्स्ट लुक प्रदर्शित झाला आहे. “झिपऱ्या’ च्या पोस्टरवर रेल्वे स्टेशनच्या फलाटावर बसलेली तीन मुले दिसत आहेत. एक जण जिन्यात बसून कशाची तरी वाट बघतोय असे दिसते आहे, तो नेमका कशाचा शोध घेत आहेत हे कळायला मार्ग नाही, एक आपल्याच मस्तीत उभा ठाकलेला आहे, एका जण आपल्याच गुर्मीत टशन देत आहे, त्याच्या हातात बूट पॉलिशची साधने दिसत आहेत. हे तिघे कोण आहेत? रेल्वे स्थानकावर काय करत आहेत? या प्रश्नांची उकल या चित्रपटातून होणार आहे.

“झिपऱ्या’ या चित्रपटाला राज्यशासनाचे संकलन, कलादिग्दर्शन, वेशभूषा हे तीन पुरस्कार जाहीर झाले आहेत तर उत्कृष्ट चित्रपट आणि नृत्यदिग्दर्शन नामांकने जाहीर झालेले आहेत. “झिपऱ्या’ येत्या 22 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये चिन्मय कांबळी, प्रथमेश परब, सक्षम कुलकर्णी, अभिनेत्री अमृता सुभाष, अमन अत्तार, देवांश देशमुख, नचिकेत पूर्णपात्रे, प्रवीण तरडे, विमल म्हात्रे, दीपक करंजीकर अशी कलाकारांची तगडी फौज आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)