झिंग झुम्बा डान्सची…

भारतातील पारंपरिक नृत्यप्रकारानंतर हळूहळू वेगवेगळे डान्सचे प्रकार भारतात येऊ लागले. हिप हॉप, सालसा, जॅझ अशा आंतरराष्ट्रीय डान्सच्या प्रकारांनी अनेकांना वेड लावलं. नवीन काहीतरी शिकयोत यामुळे अनेकांनी या डान्स क्‍लासेसना प्रवेश घेतला, पण या डान्स क्‍लासेसचा एक विशिष्ट वर्ग होता तो वर्ग म्हणजे ज्यांना डान्स येतो किंवा ज्यांना डान्सची आवड आहे असा वर्ग.

त्या पलीकडे ज्यांना नाचता येत नाही असा मोठा वर्ग मात्र यापासून लांब राहिला. त्यातल्या अवघड स्टेप्स आपल्याला जमणार नाही, त्यासाठी लागणारे भाव आपल्या चेहऱ्यावर नाहीत, वेगवेगळ्या स्टेप्स करण्यासाठी लागणारी लवचिकताही अंगात नाही, मग या सालला, जॅझ, हिप हॉपच्या फंदात कशाला पडायचे असा विचार अनेकांच्या मनात येतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यातून हे डान्स शिकून आपल्यासारख्या सामान्य माणसांनी काय करायचं? आपल्याला थोडीच मोठा डान्सर बनायचं आहे, असे अनेक प्रश्न मनात यायचे. त्यामुळे डान्सचं वेड असलेले लोक वगळता याकडे फारसं कोणी वळलंच नाही, पण कोणी असं सांगितलं की अमुक एक डान्स प्रकार शिकलात तर तुम्ही एकदम फिट व्हाल. आरोग्याविषयीच्या तुमच्या अनेक समस्या दूर होतील. हे ऐकून कोणीही तो डान्स प्रकार शिकण्यासाठी सहज तयार होईल. बरोबर ना! झुंबा नेमका हाच प्रकार आहे. हा एक डान्स फिटनेस प्रकार आहे. 90 च्या दशकात एका कोलंबीयन नृत्यदिग्दर्शकानं हा डान्स फिटनेस प्रकार तयार केला. विशेष म्हणजे हा झुंबा डान्स शिकण्यासाठी तुम्हाला उत्तम डान्स आलाच पाहिजे अशी कोणतीच अट नाही. सध्या जगभरातील 180 देशांमध्ये या झुंबाचे क्‍लासेस घेतले जातात.

फिटनेस म्हणजेच उत्तम आरोग्याची कल्पना हळूहळू भारतात पसरत चालली आहे. वाढतं वजन, सुटलेलं पोट अशा अनेक समस्या असतात. या समस्येपासून आपल्याला कसं दूर राहता येईल याचा विचार करून अनेक जण जिमिंग किंवा योगासनांकडे वळतात, पण या दोन पर्यायांपेक्षा तुम्हाला वेगळं काही हवं असेल तर झुंबा पर्यायाचा विचार करायला हरकत नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर संगीताच्या तालावर वेगवेगळ्या स्टेप्स करायच्या आणि त्यामार्फत आपलं वजन घटवायचं. थोडक्‍यात डान्स करता करता वजन घटवायचं. ही कल्पना एकदम भन्नाट आहे की नाही, पण हा डान्स फिटनेस प्रकार फक्त तरुणवर्गांनी शिकावा असं नाही. अगदी लहान मुलांपासून 60 ते 70 वर्षाचा वयोवृद्ध देखील झुंबा शिकू शकतो.

– अपूर्वा कुऱ्हेकर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)