झाशीची राणी चौक ते शिवाजी पूला पर्यंत होणार स्मार्ट रस्ता  

 

पुणे:  महापालिकेकडून पुणे स्ट्रीट प्रोग्राम अंतर्गत झाशीची राणी चौक ते शिवाजीनगर डेंगळे पुला पर्यंतच्या रस्त्याचे सुशोभीकरण तसेच पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल 8 कोटी 60 लाख रूपयांचा खर्च येणार असून हे काम दोन टप्प्यात केले जाणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात झाशीची राणी चौक ते शिवाजी पूल आणि दुसऱ्या टप्प्यात शिवाजी पूल ते डेंगळे पूल या रस्त्यावर हे काम केले जाणार आहे. स्ट्रीट प्रोग्राम अंतर्गत महापालिकेकडून सध्या जंगली महाराज रस्त्याचे सुशोभिकरण केले जात आहे. त्याच धर्तीवर या रस्त्याचेही सुशोभिकरण केले जाणार आहे. हा रस्ता हा पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेने या भागातील नागरिकांच्या आकर्षणासाठी व रहदारीसाठी या रस्त्याच्या उपयोग होणार आहे. तसेच रस्त्याचे पुनर्विकास झाल्यास या परिसरातील नागरिकांना रहदारीसाठी उत्तम दर्जाचा खड्डे विरहीत रस्ता वाहतुकीस उपलब्ध होणार असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
——-
असे असेल सुशोभिकरणाचे काम
या रस्त्याच्या दोन्ही बाजूला ओव्हरले पद्धतीने कॉंक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या शिवाय सायकलस्वारांसाठी स्वतंत्र सायकलट्रॅक तयार करणे, वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिरासमोर व महानगरपालिका भवनासमोर प्लाझा तयार करणे, नदीकडीललगतच्या बाजूने रिव्हर फ्रंटची कामे करण , आकर्षहक पेव्हरब्लॉक बसविणे,थर्मोप्लास्टिक पेंट करणे, कॅटआयस बसविले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना आणि सायकलस्वारांना सहज पणे या रस्त्याचा वापर करता येणार असून हा रस्त्यावरून पायी चालणाऱ्या नागरिकांना थेट नदीपात्र दिसणार आहे.
————–
दोन टप्प्यात होणार काम
महापालिका प्रशासनाकडून हे रस्ता विकसनाचे काम दोन टप्प्यात केले जाणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात झाशीची राणी चौक ते शिवाजी पूल या 750 मीटर मार्गाचे काम केले जाणार आहे. तो पर्यंत या ठिकाणी असलेले सर्व बसथांबे हे शिवाजी पूल ते डेंगळे पूल या ठिकाणी हलविले जाणार आहेत. केवळ कॉंग्रेस भवन येथील एक बस थांबा नागरिकांच्या सोयीसाठी सुरू ठेवला जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात शिवाजीपूल ते डेंगळे पूल या 300 मीटर रस्त्याचे विकसन केले जाणार आहे. मेट्रो प्रकल्पा अंतर्गत महापालिकेच्या समोरील सर्व बस थांबे हे शिवाजीनगर धान्यगोदामाच्या परिसरात हलविले जाणार असल्याने हे बसथांबे हलविण्यात आल्यानंतर हे काम केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)