झाल्टन ऑफ स्विंग, शुगर केन , विझार्ड ऑफ ओझील, गेट मेस्सी संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

तिसरी पूना क्‍लब फुटबॉल लीग स्पर्धा

पुणे: पूना क्‍लब तर्फे आयोजित तिसऱ्या पूना क्‍लब फुटबॉल लीग स्पर्धेत झाल्टन ऑफ स्विंग, शुगर केन , विझार्ड ऑफ ओझील व गेट मेस्सी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

-Ads-

पूना क्‍लब फुटबॉल मौदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत अखलाक पुनावालाच्या हॅट्रीक कामगिरीच्या जोरावर झाल्टन ऑफ स्विंग संघाने मार्क ओ पिर्लो संघाचा 5-0 असा दणदणीत पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. वैभव पवार व माहित थदाने यांच्या प्रत्येकी एका गोलासह शुगर केन संघाने आऊट ऑन बेल संघाचा 2-1 असा पराभव केला.

अन्य लढतीत रजित परदेशीच्या दोन व तुषार अस्वानी व समिर सय्यद यांच्या प्रत्येकी एका गोलासह विझार्ड ऑफ ओझील संघाने रॉनी ट्यून्स संघाचा 4-0 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. गेट मेस्सी संघाने आपल्या विजयी कामगिरीत सातत्य राखत ड्युक्‍स ऑफ हजार्ड संघाचा 2-1 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- उपांत्यपुर्व फेरी
झाल्टन ऑफ स्विंग – 5(अखलाक पुनावाला 5,8,14मी, गुनिश बोदी 10मी, आरिष भाटेना 12मी) वि.वि मार्क ओ पिर्लो- 0

शुगर केन -2(वैभव पवार 8मी, माहित थदाने 11मी) वि.वि आऊट ऑन बेल- 1(कपिल सावंत 4मी)

विझार्ड ऑफ ओझील- 4(रजित परदेशी 3,7मी, तुषार अस्वानी 11मी, समिर सय्यद 14मी) वि.वि रॉनी ट्यून्स-0

गेट मेस्सी – 2(प्रोमीत सुद 10मी, ब्रेडन डिसुझा 15मी) वि.वि ड्युक्‍स ऑफ हजार्ड- 1(अभय मिश्रा 7मी)

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)