झारखंड राज्याला पुण्याची भुरळ

शहर विकासासाठी महापालिकेशी करणार सामंजस्य करार


झारखंडचे शिष्टमंडळ 9, 10 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर

पुणे – देशातील राहण्यायोग्य शहरामध्ये अग्रस्थांनी असलेल्या पुणे शहराच्या विकासाची भुरळ झारखंड राज्यालाही पडली आहे. झारखंड राज्यातील शहरी विकास प्रकल्पासाठी महापालिकेने राबविलेल्या शहर विकासाच्या संकल्पनांचे आदान प्रदान करणे तसेच गुणवत्ता पूर्ण दर्जाच्या शाश्वत विकासाठी माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी झारखंड राज्याच्या नगर विकास आणि गृहनिर्माण विभागाशी सामंजस्य करार करण्याची विनंती पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.

झारखंड राज्याचे शिष्टमंडळ 9 आणि 10 ऑगस्ट रोजी पुणे महापालिकेच्या दौऱ्यावर आले होते. झारखंड राज्याच्या नगरविकास विभागाकडून महापालिकेच्या माध्यमातून शहरांमध्ये शाश्वत विकास व पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यासाठी प्रशासकीय क्षमता बांधणीवर भर दिला जात आहे. त्यासाठी झारखंड शहरी विकास कंपनी, राज्य शहरी विकास प्राधिकरण, तसेच रांची स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड, आणि झारखंड अर्बन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून शहरी विकासाच्या संकल्पना अधिकाधिक प्रभावीपणे राबविणे तसेच पुण्यात राबविण्यात येत असलेल्या शहर विकासाच्या संकल्पांनाचा फायदा झारखंड राज्यातील शहरांसाठी करून घेणे या उद्देशाने दोन्ही शहरांमध्ये सामंजस्य करार झाल्यास त्याचा लाभ शहरी विकासाच्या नवीन संकल्पनांचा विस्तार आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी होणार आहे. त्यामुळे महापालिकेशी सामंजस्य करार करण्याचे निमंत्रण नगर विकास आणि गृहनिर्माण विभागाचे सचिव अजय कुमार सिंह यांनी महापालिकेस पाठविले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)