झारखंड: नक्षलवाद्यांच्या भूसुरूंग स्फोटात 6 जवान शहीद

रांची – झारखंडमधील गढवा जिल्ह्याच्या छिंजो भागात नक्षलवाद्यांनी मंगळवारी रात्री घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात 6 जवान शहीद झाले. लातेहार आणि गढवाच्या सीमावर्ती भागातील छिंजो परिसरात नक्षलवाद्यांचा वावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिस आणि सुरक्षा रक्षकांनी संयुक्त शोध मोहीम सुरू केली. छिंजो भागात जवान पोहचताच दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सोबतच रस्त्याखाली दडविलेल्या भूसुरूंगांचा स्फोटही घडवला. यामुळे झारखंड जगुआरचे 6 जवान शहीद झाले. रात्री उशीरापर्यंत चकमक सुरूच होती. जवानांच्या मदतीसाठी सुरक्षा दलाच्या आणखी काही तुकड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्याचे समजते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)