झारखंडमध्ये 15 माणसांना मारणाऱ्या हत्तीची गोळी घालून हत्या

साहिबगंज (झारखंड)- झारखंड आणि बिहार या दोन राज्यांत 15 माणसांना मारणाऱ्या हत्तीला शुक्रवारी गोळी घालून मारण्यात आल्याची माहिती वन अधिकाऱ्यांने दिली आहे. या हत्तीला मारण्यासाठी 12 वनाधिकारी आणि एक शार्पशूटर त्याच्या मागावर होते, असे राज्य वनाधिकारी एन के सिंग यांनी सांगितले आहे.

सुमारे 20-15 वर्षे वयाच्या या हत्तीने मार्च 2017 पासून झारखंडमधील 11 माणसांचा प्राण घेतला आहे. अनेक घरांचे नुकसान केले आहे. शेजारच्या बिहार राज्यात जाऊन त्याने 4 व्यक्तींना ठार मारल्याचे सांगण्यात आले आहे.

शार्पशूटर शफात अली खान याने सांगितले, की त्याने गुरुवारी प्रथम या हत्तीला पाहिले. गुंगी आणणारा बाण त्याच्या मानेत मारला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तो जंगलात पळून गेला. मात्र शुक्रवारी त्या हत्तीला .458 कॅलिबरच्या मॅग्नम रायफलने गोळी घालून मारले. मारलेल्या हत्तीचे दात काढून घेऊन वनाधिकाऱ्यांनी जंगलातच त्याचा अंत्यविधी करणार असल्याचे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)