झारखंडमधील चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा  

रांची – झारखंडमधील सिंहभूम जिल्ह्यात आज नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली. यामध्ये पाच नक्षलवाद्यांना खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. तसेच घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

सिंहभूम जिल्ह्याच्या खूंटी- चाईबासा सीमेवर सुरक्षा दल नक्षलवादविरोधी मोहीम राबवित होते. यावेळी अचानक नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरु केला. सुरक्षा दलानीही चोख प्रत्युत्तर देत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा केला. पोलिसांनी घटनास्थळावरुन  २ एके ४७, २ पिस्तूल आणि एक ३०३ रायफल असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. दरम्यान, सुरक्षा दलाची शोधमोहीम अद्यापही सुरु आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/ANI/status/1090086478879830016

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)