झाडाझडतीत 50 बसचालकांना नोटीस

एसटी महामंडळाची कारवाई : बेशिस्त वर्तन भोवले

पुणे – मद्यपान, गुटखा-तंबाखू खाऊन बस चालविणाऱ्या बेशिस्त चालकांविरोधात एसटी महामंडळाने कठोर भूमिका घेतली आहे. महामंडळाच्या पुणे विभागातही या कारवाईला जोरदार प्रारंभ करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांत तब्बल 50 चालक पथकाच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांना नोटीस बजाविण्यात आल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या काही वर्षांत मद्यपान करुन बस चालविणे, गुटखा आणि तंबाखू खाऊन केबिनमध्येच थुंकणे, बस चालविताना हेडफोन लाऊन मोबाईलवर बोलणे आदी प्रकारात वाढ झाली होती. चालकांच्या या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्याशिवाय बसेसमध्ये अस्वच्छता वाढत चालली होती. असे वर्तन करणाऱ्या चालकांना महामंडळाच्या वतीने वारंवार समज देण्यात आली होती, तरीही त्यांच्या बेशिस्तिमध्ये कोणताही फरक पडला नव्हता.

महामंडळाच्या वतीने ही कारवाई येत्या 19 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. साध्या वेषातील अधिकारी आणि कर्मचारी बसमध्ये बसून चालकाच्या हालचालीवर लक्ष ठेवत आहेत. कारवाईत सातत्य ठेवण्यात येणार असून ही कारवाई कठोरपणे करण्याच्या सूचना संबधित पथकांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाच्या पुणे विभागाच्या विभाग नियत्रंक यामिनी जोशी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)