झाडाची फांदी गाडीवर पडल्याने एकास मारहाण

उरूळी कांचनला घटना : पाच जणांवर गुन्हा दाखल

लोणी काळभोर- नारळाची फांदी चारचाकी गाडीवर पडली, या कारणावरून चिडून शिवीगाळ, दमदाटी करून, नारळाची फांदी पाठीवर तर दगडाने डोक्‍यात मारहाण करण्यात आली. यावेळी संतप्त शेजाऱ्याने लोखंडी गजाने खिडकीची काच व दरवाजा तोडून फिर्यादीची आई व पत्नी यांनाही शिवीगाळ करीत मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निलेश कांतीलाल ओसवाल (वय 36, रा. आनंद भवन, आश्रमरोड, ऊरूळी कांचन) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी असिफ रूस्तमभाई मध्यावर, बबलू रूस्तमभाई मन्यार, अरीफ रूस्तमभाई मन्यार, नाझिया असिफ मन्यार, जास्मिन बबलू मन्यार (सर्वजण रा. आश्रमरोड, ऊरूळी कांचन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओसवाल व मन्यार हे शेजारी रहातात. दि. 21 मार्च रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास निलेश ओसवाल यांनी आपल्या ओळखीचा मुलगा राहूल शहा यास आपल्या घराच्या अंगणात असलेल्या नारळाचे झाडावरील नारळ पाडण्यास सांगितले. राहुल झाडावर चढला व नारळ पाडण्यास सुरुवात केली. त्यावेळी नारळाचे झाडाची फांदी तुटली. ती मन्यार यांनी खाली लावलेल्या कारवर पडली. आवाज ऐकून शेजारी राहणारे असिफ मन्यार बाहेर आले. त्यांनी ओसवाल यांना शिवीगाळ केली. पडलेल्या फांदीने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मन्यार यांची पत्नी व वहिणी आल्या. त्यांनीही ओसवाल यांना मारहाण केली.

यावेळी असिफ याने दगड त्यांच्या डोक्‍यात मारला. आरडाओरडा ऐकून बबलू मन्यार तेथे आला. तोही मारहाण करण्यास येत आहे, हे पाहून सर्व ओसवाल कुटुंबीय घरात गेले. आतून दरवाजा लावून घेतला. हे पाहून बबलू याने घराचे बाहेर असलेल्या गेटच्या दरवाजाचा गज तोडला. खिडकी, दरवाजाची तोडफोड केली. मारहाण होईल या भीतीपोटी ओसवाल कुटुंबातील कोणीही बाहेर पडले नाही. मन्यार बंधू पोलीस दूरक्षेत्रात तक्रार देण्यासाठी गेले. त्यावेळी पोलिसांनी ओसवाल यांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी तक्रार दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)