झाडांना राख्या बांधून पर्यावरणाचा संदेश

शेलपिंपळगाव -पर्यावरण ही काळाची गरज असून, पर्यावरण अखंडपणे टिकून राहण्याकरिता रक्षाबंधन या बहीण-भावाचे नाते घट्ट करणाऱ्या सणाचे औचित्य साधून चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील बहुळ, सिद्धेगव्हाण (ता. खेड) येथे अखिल भारतीय माहिती सेवा समितीच्या महिला संघटन खेड तालुकाध्यक्षा रुपाली आरेकर, ज्योती साबळे, ज्योती तापकीर, सुजाता चौधरी, कविता तांबे, जयश्री भालेकर, रुपाली मोहिते, भामाबाई साबळे, आकांक्षा साबळे, रोहिणी मोरे आदी महिला पदाधिकारी यांनी एकत्रित येऊन चक्क झाडांना राखी बांधून पर्यावरणाचा अनोखा सदेश दिला.
ग्रामीण भागात दिवसेंदिवस झाडे लावण्यापेक्षा झाडांची तोड करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आपोआपच प्रदूषणात वाढ होवून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे. पर्यावरणाचे महत्त्व सर्वांना कळावे व त्यातून समाज जागृती व्हावी, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून अखिल भारतीय माहिती सेवा समितीच्या काही महिला पदाधिकारी एकत्रित आल्या. समाजाला पर्यावरणाचा संदेश देण्याकरिता रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून त्यांनी झाडाला राखी बांधली. निसर्गाशी अनोखे नाते जोडण्यासाठी अखिल भारतीय माहिती सेवा समितीच्या महिला संघटन पदाधिकारी महिलांनी झाडाला राखी बांधण्याचा हा अभिनव उपक्रम राबविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)