झाडांच्या पानांपासून कंपोस्ट खताची निर्मिती

पुणे- वसंत ऋतू लागला की झाडांची वाळलेली पाने गळती त्याजागी नवी पालवी येऊ लागते. दरवर्षी पानांची गळती होऊन प्रचंड ब्राउन लीफ कचरा निर्माण होतो. काही जणांकडून हा कचरा जाळून टाकला जातो. मात्र, तसे न करता या कचाऱ्यापासून कंपोस्ट खत निर्माण केले जावू शकते हे फार कमी लोकांना माहीत असते. असाच उपक्रम पुण्यातील अदिती देवधर राबवत आहेत. “ब्राउन लीफ’ उपक्रमांतर्गत शहरातील ब्राउन लीफ कचरा एकत्र करत त्यापासून खत निर्मिती करण्याचे काम त्या करत आहेत. त्या 2016 पासून हा उपक्रम राबवत असून झाडांच्या प्रत्येक पानाला अग्निमुक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

याशिवाय, हा कचरा जाळल्यास त्याच्या धुरामुळे विषारी कण हवेत मिसळून वायुप्रदूषण होते. त्या ऐवजी याचा खतासाठी उपयोग केल्यास तो झाडांना संजीवनी ठरु शकते. त्यामुळे या पानांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी हा उपक्रम सुरू केला असल्याचे आदिती देवधर यांनी सांगितले. झाडांची गळून पडलेली पाने जमिनीत रुजवून त्यापासून कंपोस्ट खत करता येते. तसेच, ही पाने झाडभोवती जरी रुजून ठेवल्यास ती झाडांच्या वाढीसही उपयुक्त ठरू शकतात. या पानांमध्ये 50 ते 100 टक्‍के पोषक द्रव्य असतात. हे द्रव्य जमिनीसाठी अत्यंत उपयुक्‍त असतात. या पानांमुळे जमिनीतील ओलावा टीकून राहातो आणि बाष्पिभवन कमी होते. त्यामुळे अशी पाने जमिनीत रुजवली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)