झाकीया जाफरींच्या याचिकेवरील सुनावणी 26 नोव्हेंबर पर्यंत तहकुब

पंतप्रधान मोदींच्या विरोधात आहे याचिका

नवी दिल्ली – गुजरात मध्ये 2002 मध्ये गोध्रा जळीतकांडानंतर झालेल्या दंगलीबद्दल तत्कलिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना विशेष तपास पथकाने जी क्‍लीन चीट दिली आहे, त्याला आव्हान देणारी याचिका झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती त्या याचिकेवरील सुनावणी न्यायालयाने 26 नोव्हेंबर पर्यंत तहकुब केली आहे.

झाकिया जाफरी या दंगलीत ठार झालेले माजी खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी आहेत. त्यांनी विशेष तपास पथकाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका गुजरात उच्च न्यायालयात दाखल केली होती पण 5 ऑक्‍टोबर 2017 रोजी त्यांची याचिका फेटाळण्यात आल्यानंतर त्याच्या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

-Ads-

आज या विषयाची जी प्राथमिक सुनावणी झाली त्यावेळी युक्‍तिवाद करताना ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी म्हणाले की झाकियांची याचिका सुनावणीस घेण्याच्या योग्यतेची नाही. या याचिकेत तीस्ता सेटलवाड या दुसऱ्या वादी आहेत त्यांचाही या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. या प्रकरणाचा आम्ही नंतर विचार करू असे नमूद करीत न्यायालयाने ही सुनावणी 26 नोव्हेंबर पर्यंत पुढे ढकलली. एसआयटीने ही केस बंद करण्याची शिफारस या आधीच केली आहे.

8 फेब्रुवारी 2012 रोजी एसआयटीने या प्रकरणात क्‍लोजर रिपोर्ट दिला आहे. त्यात मोदींसह अन्य 63 जणांना क्‍लिन चीट देण्यात आली आहे. एसआयटीचे हे काम सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखेखालीच चालले होते त्यामुळे त्यांनी दिलेला रिपोर्ट महत्वाचा आहे असे नमूद करीत उच्च न्यायालयाने झाकिया यांची याचिका फेटाळून लावली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)