झाकिर नाईकच्या चार मालमत्ता जप्त करण्याचा आदेश 

मुंबई: फरार इस्लामिक प्रचारक झाकिर नाईक याच्या चार मालमत्ता जप्त करण्याचा आदेश विशेष एनआयए न्यायालयाने दिला. त्या मालमत्ता मुंबईच्या माजगांव परिसरात आहेत.

नाईकच्या विरोधात दोन वर्षांपूर्वी बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापाठोपाठ जून 2017 मध्ये न्यायालयाने त्याला फरार म्हणून घोषित केले. त्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) नाईकच्या मुंबईतील दोन सदनिका आणि एका व्यावसायिक इमारतीवर टाच आणली. आता नाईकच्या आणखी चार मालमत्ता जप्त करण्याची परवानगी मागणारा अर्ज एनआयएकडून दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयाने मंजुरी दिली.

परदेशात वास्तव्यास असणाऱ्या नाईकला विविध स्त्रोतांकडून मिळणारा पैसा गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर रोखला गेला आहे. त्यामुळे पैसा उभा करण्यासाठी तो मालमत्ता विकण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली. नोव्हेंबर 2016 मध्ये केंद्र सरकारने नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनला बेकायदा ठरवले. त्यानंतर व्याख्यानांच्या माध्यमातून अनेकांना दहशतवादी कृत्ये करण्यासाठी चिथावत असल्याचा आरोप ठेऊन नाईकच्या विरोधात एनआयएने गुन्हा दाखल केला. c

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)