नवी दिल्ली – दहशतवाद्यांना निधी पुरवल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेला काश्‍मीरी व्यावसायिक झहुर वताली याला दिल्ली उच्च न्यायालयाने मंजुर केलेल्या जामीनाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

लष्कर ए तोयबाचा संस्थापक हाफिज सईदकडून काश्‍मीरातील दहशतवाद्यांना निधी पुरवला जातो त्यात वताली याने महत्वाची भूमिका बजावली आहे असे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याला आता जामीनावर सोडले तर या प्रकरणाच्या तपासावर विपरीत परिणाम होऊ शकतो असा दावा एनआयएच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला होता तो न्यायालयाने ग्राह्य मानून त्याच्या सुटकेला स्थगिती दिली.

या जामीनाला स्थगिती देतानाच या प्रकरणात आरोपींलाही त्याचे म्हणणे मांडण्याची संधी न्यायालयाने दिली असून त्याची सुनावणी आता 26 सप्टेंबरला होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)