झळकवा जगण्याचे दीड शतक (भाग २)

जोसेफ तुस्कानो 

स्त्रज्ञांनी माणसाच्या आयुष्याशी निगडीत एज-1, एज-2, क्‍लोफ-2 अशा जनुकांचा शोध लावला आहे. शरीरावर वयाचा परिणाम केव्हा दिसू लागतो याचाही शोध घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तरूण आणि मध्यमवयीन लोकांच्या जनुकसंहितेला स्कॅन करून याचे रहस्य उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 2050 पर्यंत माणसाचे आयुष्य वाढण्याची प्रक्रिया कमी करण्याचा मंत्र आपल्याकडे असेल असे शास्त्रज्ञ रिचर्ड डॉकिन्स यांनी म्हटले आहे. स्टेम सेल, टी ह्यूमन बॉडी शॉप आणि जीन थेरपी यांच्याद्वारे माणसाचे आयुष्य 150 वर्षांहूनही अधिक होण्याची शक्‍यता शास्त्रज्ञांना वाटते. खरंच असे होईल? 

वय वाढवण्याच्या काही युक्‍त्या 

वय वाढवणारे खाद्यपदार्थ विकसित करण्यावर सर्वाधिक संशोधन सुरू आहे. यात गेटो नावाच्या एका वनस्पतीवर संशोधन होत आहे. जपानमधील ओकिनावा क्षेत्रात सर्वाधिक शतायुषी लोक राहतात. याच गोष्टीवरून हे संशोधन सुरू झाले आहे. ओकिनावा येथील रियुक्‍यूस विद्यापीठातील कृषिशास्त्रज्ञ प्रा. शिंकीची तवाडा यांनी या लोकांच्या शतायुषी होण्याचे श्रेय गेटो या वनस्पतीला दिले आहे.

गडद पिवळ्या-भुऱ्या रंगाच्या या वनस्पतीचा अर्क माणसाचे वय 20 टक्‍क्‍यांनी वाढवतो. ही आले (जिंजर) प्रवर्गातील ही वनस्पती आहे. तवाडा या वनस्पतीवर गेली वीस वर्षे संशोधन करत आहेत. त्यांनी कीटकांवर एक प्रयोग केला. त्यांनी गेटोच्या अर्काचा खुराक कीटकांना दिला तेव्हा त्यांना आढळून आले की त्यांचे आयुष्यमान 22 टक्‍क्‍यांनी वाढले. मोठी हिरवी पाने, लाल फळे आणि पांढरी शुभ्र फुले असलेली गेटो ही वनस्पती ओकिनावाच्या लोकांच्या जेवणातील एक प्रमुख भाजी आहे. इतर अँटी ऑक्‍सीडंट्‌सच्या तुलनेत गेटो अधिक प्रभावी आहे. जगातील अन्य भागांत राहणाऱ्या लोकांवरही गेटो तितकीच प्रभावशील राहील का यावर आता संशोधन सुरू आहे.

चीनमध्ये सर्वाधिक वृद्ध 

जपानमध्ये तरूणांच्या तुलनेत वृद्धांची संख्या जास्त आहे, पण चीनच्या हैनान प्रांतातील चेंगमाई गावात जगातील सर्वाधिक वृद्ध राहतात. इथल्या 200 लोकांनी वयाची शंभरी पार केली आहे. या गावात संत्र्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. गावाची लोकसंख्या आहे 5,60,000. त्यातील दोनशे लोक शंभरी पार केलेले आणि तीन लोक 110 वर्षांहून अधिक वयाचे आहेत. जगात असे केवळ 400 लोक आहेत.

ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या एका दांपत्याने नुकताच आपल्या लग्नाचा 90 वा वाढदिवस साजरा केला. त्या समारंभात त्यांची 8 मुले, 27 नातवंड आणि तेवीस पणतवंडे सहभागी झाली होती. सरासरी वयोमान सर्वाधिक असलेला देश आहे मोनॅको. तेथील सरासरी वयोमान 89.63 वर्षे आहे.

इथल्या लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे ते तणावरहीत जीवन जगतात आणि आहाराविषयी जागरूक आहेत. हिरव्या भाज्या, सुका मेवा आणि रेडवाईन यांचे सेवन ते करतात. माणसाने वयाची शंभरी नव्हे तर 150 वर्षे गाठली तरी त्याचे आयुष्य हे निरोगी आणि सक्रियतेचे असायला पाहिजे, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)