झणझणे कुटुंबियांची ऊसतोड मजुरांना मायेची उब

नातवाच्या वाढदिनी विलास झणझणेंकडून स्वेटर, ब्लॅंकेट वाटप

आदर्की – सध्याच्या युगात वाढदिवस म्हटल की सेलिब्रेशन, दारु-मटणाच्या पार्ट्या, फटाक्‍यांची आतीषबाजी हे ठरलेलं असतं. मात्र, या सर्व गोष्टींना बगल देत सध्या पडत असलेल्या कडक्‍याच्या थंडीचा विचार करुन आपल्या नातवाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ऊस तोड मजुरांना स्वेटर, ब्लॅंकेटसह उबदार कपड्यांचे भेट देऊन मायेची उब दिली आहे फलटण तालुक्‍यातील टाकोबाईचीवाडी येथील माजी सरपंच विलासराव झणझणे यांनी. झणझणे यांनी जोपासलेल्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या राज्यभरात ऊस तोडणीचा हंगाम सुरु आहे. परजिल्ह्यासह परराज्यातील मजुर सातारा जिल्ह्यात ऊसतोडणीसाठी आपल्या कुटुंबासह दाखल झाले आहेत. शेतामध्येच झोपड्या टाकून हे मजुर राहत आहेत. दरम्यान, सध्या जिल्ह्यात सर्वत्रच मोठ्या प्रमाणात थंडीची लाट पसरली आहे. पार 20 अंशाहुन खाली गेल्याने सर्वसामान्य नागरिक सायंकाळी सात नंतर तसेच सकाळी सात शिवाय घरातून बाहेर न पडणेच पसंत करत आहेत. मात्र, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी आपलं गाव, आपला जिल्हा सोडून आलेले ऊसतोड मजुर मात्र, पहाटे सहा वाजताच शेतकऱ्याच्या बांधावर दाखल होत आहे.

थंडीची तमा न बाळगता पहाटेपासून कामाला सुरुवात करत आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच सामाजिक बांधिलकीचे भान ठेऊन टाकोबाईचीवाडी येथील माजी सरपंच विलासराव झणझणे यांनी विराट झणझणे या आपल्या नातवाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून टाकोबाईचीवाडी येथील ऊसतोडणीसाठी आलेल्या दहा ते पंधरा मजुर कुटुंबांना स्वेटर, ब्लॅंकेटसारख्या उबदार कपड्याचे वाटप केले. जेणेकरुन या मजुरांचे थंडीपासून संरक्षण होईल.

झणझणे यांच्या या उदारमतवादी निर्णयाला त्यांची पत्नी योगिनी झणझणे, मुले विक्रांत झणझणे, वैभव झणझणे, सुना सौ. तेजस्वनी झणझणे, सौ. किरण झणझणे व खास वाढदिवसाठी आलेली विलासराव झणझणे यांची मुलगी चाकण नगरपरिषेदची नगरसेविका सौ. वृषालीताई देशमुख यांनीही साथ देत पुढाकार घेतला. दरम्यान, झणझणे कुटुंबियांनी ऐन थंडीत ऊस कामगार तसेच रस्त्यावर काम करणाऱ्या कामगारांना मायेची उब दिली असून त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)