झकीर नाईकच्या प्रत्यार्पणाबाबतची माहिती देण्यास विदेश मंत्रालयाचा नकार

नवी दिल्ली: वादग्रस्त इस्लामी व्याख्याता झकीर नाईक याला मलेशियातून भारतात आणण्याच्या प्रक्रियेविषयेची माहितीच्या अधिकारात कोणतीही माहिती देण्यास विदेश मंत्रालयाने नकार दिला आहे. दहशतवादी कारवायांचे आरोप असलेल्या झकीर नाईकसंदर्भात देशात तपास सुरू आहे. त्याला भारताच्या ताब्यात द्यावे अशी विनंती मलेशियाकडे करण्यात आली आहे. प्रत्यार्पणाच्या प्रकरणांसंदर्भातली माहिती “आरटीआय’ अंतर्गत मागवली असता प्रत्यार्पणाची 160 प्रकरणे प्रलंबित आहेत असे उत्तर देण्यात आले. मात्र मलेशियाकडे केलेल्या विनंतीसंदर्भात विचारणा केली असता तपास सुरू असलेल्या प्रकरणांची माहिती दिली जाऊ शकणार नसल्याचे कारण सांगितले गेले.

भारताने मलेशियाकडे झकीर नाईकच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. त्यावर त्या देशाकडून विचार सुरू असल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्‍ते रवीश कुमार यांनी गेल्या महिन्यात म्हटले होते. भारताने मलेशियाबरोबर गुन्हेगार प्रत्यार्पणासंबंधीचा करार केला आहे. मात्र झकीर नाईकला मलेशिया सरकार सहजासहजी भारताच्या स्वाधीन करणार नाही. जोपर्यंत नाईक मलेशियामध्ये काही गैरकृत्य करत नाही, तोपर्यंत त्याच्याविरोधात कारवाई केली जाणार नाही. त्याच्याशी संबंधित सर्व बाबी तपासल्यावरच त्याच्याशी संबंधित निर्णय केला जाईल, असे मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी म्हटले आहे. झकीर नाईक जुलै 2016 मध्ये देशातून पळाला आहे. त्याच्यावर दहशतवादी कारवाया आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)