ज्वेलर्सला भगदाड पाडून चोरी

पिंपरी – हिंजवडी येथील शिवाजी चौकात असलेल्या बारामती ज्वेलर्सच्या भिंतीला मोठे भगदाड पाडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे एकूण 80 हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. ही चोरी बुधवारी (दि. 30) सकाळी दहाच्या दरम्यान झाली. याप्रकरणी दुकानाचे व्यवस्थापक संतोष मधुकर लोळगे (वय-37, रा. नढेनगर, काळेवाडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री लोळगे आणि तेथील काही कामगार हे नेहमीप्रमाणे रात्री दहाच्या सुमारास दुकान बंद करुन घरी गेले. बुधवारी लोळगे हे सकाळी दहाच्या सुमारास दुकान उघडण्यास गेले असता त्यांना दुकानाच्या भिंतीला मोठे भगदाड पाडून चोरट्यांनी दागिने चोरुन नेल्याचे निदर्शनास आले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)