ज्वलनशील रसायन टॅंकरची बसथांब्याला धडक

करंजे- नीरा-बारामती राज्य महामार्गवर आज (शनिवार) पहाटे साडेतीनच्या सुमारास ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीच्या ज्वलनशील रसायन घेऊन जाणारा टॅंकरने करंजेपूल (ता. बारामती) येथील बस थांब्याला जोरदार धडक दिल्याने थांब्याचे मोठे नुकसान झाले. तर टॅंकरचालक गंभीर जखमी झाला आहे.
दरम्यान, ज्वलनशील रसायन रस्त्यावर सांडल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्‍यता होती मात्र, कंपनी आणि आग्निशमक दल यांनी वेळीच घटनास्थळी बचावकार्य केल्याने व पहाटेची वेळ असल्याने दुर्घटना घडली नाही. याबाबतची माहिती अशी की, नीरा येथून ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीचे ज्वलनशील रसानयन घेऊन टॅंकर (एमएच 04 डीके 4338) बारामतीकडे निघाला होता मात्र, करंजेपूल महाविद्यालयाच्या जवळ चालकाचे टॅंकरवरील नियंत्र सुटल्याने टॅंकर थेट नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकावर धडकला. यात चालक गंभीर जखमी झाला असून बसस्थानकाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या टॅंकरमधील सुमारे 5 हजार लीटर रसायनाची टॅंकरमधून गळती झाल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्‍यता निर्माण झाली होती मात्र, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व अग्निशामक यंत्रणेने वेळीच घटनास्थळी धाव घेत या रसायनाची विल्हेवाट लावल्याने अनर्थ घडला नाही. तसेच करंजेपूल पोलीस दूरक्षेत्रातील कर्मचारी नितीन बोराटे, होमगार्ड असिफ शेख व स्वप्नील काकडे यांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी टॅंकरचालकास खासगी रुग्णालायत दाखल केले. तसेच कंपनीतील अधिकाऱ्यांना संपर्क करताच कंपनीतील अधिकारी घटनास्थळी आले व परस्थिती पाहून उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना आम्ही बसस्थानकाचे नुकसानभरपाई देऊ असे आश्‍वासन दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)