ज्योत्स्ना शिंदेंची उचलबांगडी

पिंपरी – महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्या कामकाजाबाबत असंख्य तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांना पुन्हा शासन सेवेत पाठविण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला आहे. त्यांना पुन्हा माघारी शासन सेवेत पाठविण्याचा निर्णय पालिका सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे.

प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे या राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर पालिकेत रूजू झाल्या आहेत. प्रथमच त्या पालिका सेवेत कार्यरत आहेत. मात्र, त्यांच्या कामकाजावर नव्याने स्थापन झालेली शिक्षण समितीचे पदाधिकारी व सदस्य नाराज आहेत. समिती सभेच्या विषयपत्रिका तयार केल्या जात नाहीत. शाळांसाठी ठोस नियोजन केले जात नाही. शाळांचा दर्जा वाढीसाठी त्यांच्याकडून काहीच प्रयत्न केले जात नसल्याचे आरोप पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी केले आहे.

-Ads-

त्यावर ठोस कार्यवाही करणे सोडून, मनुष्यबळ अपुरे असल्याचे उत्तर त्या देत आहेत. तसेच, पालिकेतील अनेक पदाधिकारीही त्यांच्या अकार्यक्षम पद्धतीवर नाराज आहेत. शिक्षण विभागाबाबत माहिती मागितली असता, त्याबाबत माहिती घेऊन उत्तर दिले जाईल, असे उत्तर त्या देत होत्या. त्यामुळे त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या एका नगरसेवकाने धरणे आंदोलनही केले होते. त्याच्या अकार्यक्षम व हेकेखोर पद्धतीमुळे सर्वच पक्षाचे पदाधिकारी तीव्र नाराज आहेत.त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी उघडपणे केली जात होती.

अखेर सत्ताधारी भाजपने त्यांना शासन सेवेत परत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. सदर निर्णय नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. ही उपसूचना भाजपचे नगरसेवक नामदेव ढाके यांनी मांडली. त्यास भाजपचे सुरेश भोईर यांनी अनुमोदन दिले आहे. दरम्यान, शिंदे या पुण्यातील महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) विभागात सहायक संचालक होत्या. त्या जून महिन्यात पालिकेच्या शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी म्हणून रूजू झाल्या होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)