ज्योती-क्रांतीमुळे जामखेडचा देशात नावलौकिक – ना. शिंदे

जामखेड – जवळा येथील ज्योती क्रांती संस्थेमुळे ग्रामीण भागात व्यावसायिक क्रांती झाली असून याव्दारे परिसरातील हजारो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून ज्योती क्रांती संस्थेने महाराष्ट्रत नव्हे तर देशात वेगळा ठसा उमटवून जामखेड तालुक्‍याच्या नावलौकिक भर पडल्याचे मत पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्‍त केले.
जवळा येथील ज्योती-क्रांतीच्या किसान क्रांतीच्या दुग्धजण्य पदार्थापासून बायप्रोडोक्‍ट निर्मिती प्रकल्पाचे उद्‌घाटन ना. शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते मुरलीधर हजारे होते. यावेळी पंचायत समिती सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती सुर्यकांत मोरे, जामखेड तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, कर्जत तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, जामखेडचे नगराध्यक्ष निखील घायतडक, कर्जत उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, ज्योती क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख आजिनाथ हजारे, सरपंच प्रशांत शिंदे, डॉ. भगवान मुरुमकर, भाजपचे तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, उपाध्यक्ष दशरथ हजारे, मारुती रोडे, विष्णू हजारे, व्यवस्थापक किरण वर्पे, संचालिका संगीता रोडे, धनलक्ष्मी हजारे, लता हजारे, वंदना हजारे, ज्योती वर्पे, शहाजी पवार, डॉ.महादेव पवार, बाजीराव पठाडे, बिभिषण लेकुरवाळे, प्रशांत पाटील, सरपंच अनिल पवार, ज्येष्ठ नेते दशरथ कोल्हे, उपसरपंच गौतम कोल्हे, बाबासाहेब महारनवर, बबन ठकाण, साहेबराव पांडूळे, नान्नजचे विद्यमान सरपंच डॉ. मोहळकर, माजी सरपंच संतोष पवार, आदी उपस्थित होते.
ना. शिंदे म्हणाले, महिला बचतगटापासून व्यावसायिक चळवळ उभी करून पतसंस्था, मल्टीस्टेट बॅंक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, इंग्रजी माध्यमांची शाळा, दूध उत्पादन व संकलन दुग्धजन्य पदार्थापासून बायप्रोडोक्‍ट प्रकल्प सुरु करून खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात या संस्थेने व्यावसायिक क्रांती घडवून आणली आहे. ज्योती- क्रांती ग्रामीण भागात काम करत असताना देखील त्यांनी महाराष्ट्रात मर्यादित न राहता देशामध्ये काम करत असल्यामुळे या संस्थेने उंची गाठली आहे. क्रांतीचे दुग्धजण्य पदार्थापासून बायप्रोडोक्‍ट निर्मिती प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे यावेळी ते म्हणाले.
आजिनाथ हजारे म्हणाले, ज्योती-क्रांतीचे छोटेशे रोपटे लावले होते. त्यांचे रुपांतर आता वटवृक्ष होताना दिसत आहे. ज्योती क्रांतीचे क्रांती ज्योती इंग्लिश शाळा, दुध संघ, ज्योती क्रांती मल्टीस्टेट बॅंक अशा विविध फर्मच्या माध्यमातून संस्थेचा आलेख उंचावला आहे. माझ्यासह सर्व संचालक मंडळ रात्रदिवस काम करत आहोत. त्यामुळे जवळ्याचे नाव महाराष्ट्रात नव्हे तर देशात नाव घेतले जात आहे. यावेळी दुग्धजण्य पदार्थापासून बायप्रोडोक्‍ट निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून श्रीखंड, आम्रखंड, तसेच दही, लस्सी, चक्का, पनीर, तूप, खवा, आईस्क्रीम आदी पदार्थ तयार करणार असल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले तर आभार शाखा व्यवस्थापक किरण वर्पे यांनी मानले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
24 :thumbsup:
6 :heart:
2 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)