ज्येष्ठ साहित्यिक नामवर सिंह यांचे निधन

नवी दिल्ली – हिंदी साहित्यातील ज्येष्ठ लेखक, समीक्षक नामवर सिंह यांचे काल रात्री वयाच्या 92 वर्षी निधन झाले. एका महिन्यापासून दिल्लीतील एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे लाईफ सपोर्ट सिस्टमवर होते. नामवर सिंह यांनी 11 वाजून 51 मिनिटांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्यावर दिल्लीतील लोधी रोडवर असलेल्या समशान घाटात अंतिम संस्कार करण्यात आले.

नामवर सिंह यांचा जन्म 28 जुलै 1927 रोजी वाराणसीमधील जियानपुर (आताचे चंडौली) गावात झाला होता. हिंदी साहित्यमध्ये त्यांनी एमए आणि पीएचडीचे शिक्षण बनारस हिंदु विद्यापीठातून पूर्ण केले. त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1959मध्ये चकिया-चंदौलीमधून कम्युनिस्ट पार्टीकडून त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली आहे. पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

त्यांनी छायावाद (1955), इतिहास और आलोचना(1957), कहानी : नयी कहानी (1964), कविता के नए प्रतिमान (1968), दूसरी परंपरा की खोज(1982), वाद विवाद संवाद (1989), यासारख्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. त्यांची मुलाखत असलेले “कहना न होगा’ हे पुस्तक देखील साहित्य जगतात प्रसिद्ध आहे.

ते 1959-60 मध्ये सागर विश्वविद्यालय (म.प्र.) हिंदी विभागात सहायक प्राध्यापक होते. 1960 ते 1965 पर्यंत त्यांनी वाराणसीतून स्वतंत्र लेखन केले. 1965 मध्ये “जनयुग’ साप्ताहिकाचे संपादक म्हणून दिल्लीत काम केले. 1967 पासून त्यांनी “आलोचना’ त्रैमासिकाचे संपादक सुरु केले होते. वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करताना त्यांनी आपली साहित्यसेवा सुरूच ठेवली होती. त्यांनी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ वर्धाचे कुलाधिपती म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.
दरम्यान, नामवर सिंह यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)