ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची एक लाखाची फसवणूक

पिंपरी – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (वय 70, रा. कुणाल आयकॉन रोड, पिंपळे-सौदागर)यांची 24 सप्टेंबर ते 25 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीत ऑन लाईन एक लाखाची फसवणूक केली आहे. त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात रेणुका आचार्य (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही.), प्रशांत दीक्षित (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही.) यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी कोत्तापल्ले यांच्याशी मोबाईल आणि मेलने वेळोवेळी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले संपर्क केला. त्यांनी कोत्तापल्ले यांची एचडीएफसी बॅंकेत कोणत्याही प्रकारची पॉलिसी नसताना पॉलिसीचे पैसे जास्त मिळतील, असे आमीष दाखवले. त्यांना एक लाख रुपये खात्यावर भरण्यास प्रवृत्त केले. त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी तपास करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)