ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटेंच्या जयंतीनिमित्त गुगलची अनोखी मानवंदना

महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट येथे २६ डिसेंबर १९१४ साली श्रीमंत घराण्यात जन्माला आलेल्या बालकाने महाराष्ट्रासह देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली. एका कुष्ठरोग्याला पावसात भिजताना पाहिले आणि त्याच्या मदतीला कोणीच आले नाही, हे पाहून बाबा आमटे यांचे मन हेलावून गेले. त्या माणसात त्यांनी स्वतःला पहिले आणि इथेच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. गांधीवादी विचारांनी प्रेरीत असलेल्या बाबा आमटे यांनी समाजसेवेसाठी स्वतःचे आयुष्य वाहून देण्याचे ठरवले. बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी चंद्रपूरमध्ये आनंदवन आश्रम सुरू केला. आज त्यांच्या कार्याला जयंतीनिमित्त गुगलने अनोखी मानवंदना दिली आहे.

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त गुगलने त्यांच्या समाजकार्याचे, कुष्ठरोग्यांसाठी आश्रमाची निर्मिती, कुष्ठरोग्यांची केलेली सेवा, नर्मदा बचाव आंदोलन, वन्यजीव संरक्षण, भारत जोडो आंदोलन या सगळ्यांचा आढावा घेत गुगलने एक खास डुडल तयार केले असून त्यांनी केलेल्या कार्याला अनोखी मानवंदना दिली आहे. बाबा आमटे यांचे समाजकार्य महान असून त्यांची पुढची पिढीही त्यांचा वारसा चालवते आहे. बाबा आमटे यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार, पद्मश्री, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण अशा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)