ज्येष्ठ समाजसेवक डॉ. लोहिया यांचे निधन 

बीड – ज्येष्ठ समाजसेवक तथा मानवलोकचे संस्थापक डॉ. द्वारकादास शालीग्रामजी लोहिया यांचे वयाच्या 81 व्या वर्षी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. अंबाजोगाई येथील खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्‍चात प्रा. अभिजीत लोहिया, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, मुलगी प्रा. अरूंधती पाटील, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.

राष्ट्रसेवादल, सानेगुरूजी आरोग्य मंडळ, सोशालिस्ट पार्टी आदी व्यापक संघटनांत राहून जनसामान्यांच्या दुःखावर फुंकर घालून त्यांचे सत्व जपणारे व संघर्षाची प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला होती. मानवलोकच्या माध्यमातून अंबाजोगाईचे नाव त्यांनी जगाच्या नकाशावर पोहोचविले.

-Ads-

सामान्य माणसांचा आधारवड म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक होता. मानवलोक या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी साडेचार दशके विविध सामाजिक उपक्रम राबविले. मनस्विनी प्रकल्पाच्या माध्यमातून वंचित व परित्यक्‍त्या महिलांना आधार दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)