ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांचे  निधन

मुंबई – ज्येष्ठ संगीतकार गीतकार यशवंत देव यांचे निधन झाले आहे. दादरच्या शुश्रुषा रुग्णालयात त्यांनी पहाटे दीड वाजता अखेरचा श्वास घेतला. ते ९१ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते.

देव यांना अशक्तपणामुळे १० ऑक्टोबर रोजी शुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीत त्यांना चिकुनगुनियाची लागण झाल्याचे उघड झाले होते. त्याचबरोबर त्यांना न्यूमोनियाचीही  लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्यादृष्टीने त्यांच्यावर उपचार ही सुरू होते. अखेर आज पहाटे दीड वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्या लेखनकौशल्य आणि संगीत दिग्दर्शनाने अनेक वर्ष त्यांनी संगीतक्षेत्रावर अधिराज्य गाजविले. अभंग, भावगीत, लोकगीत, युगलगीतांना त्यांनी संगीतबद्ध केले. ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘तिन्ही लोक आनंदाने’, ‘जीवनात ही घडी’, ‘स्वर आले दुरुनी’, ‘असेन मी नसेन मी’, ‘अखेरचे येतील माझ्या…’ अशा अनेक गीतांना यशवंत देव यांनी संगीतबद्ध केले आहे. आकाशवाणीवरून त्यांनी संगीत कारकिर्दीला सुरवात केली. यशवंत देव यांना गदिमा पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)