ज्येष्ठ लेखिका डॉ. अरुणा ढेरेंची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

यवतमाळ: ज्येष्ठ लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांची 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. 11, 12, 13 जानेवारीला यवतमाळमधील पोस्टल मैदानावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असून साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी ढेरे यांच्या नावाची घोषणा केली.

महामंडाळाच्या विविध घटक संस्थांकडून संमेलनाध्यक्षपदासाठी आलेल्या नावांतून एकाची निवड करण्यासाठी यवतमाळमध्ये रविवारी बैठक पार पडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावर्षी यवतमाळ येथे होत असलेल्या संमेलनापासून अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता सन्मानाने निवड केली जाईल, असा ऐतिहासिक निर्णय अखिल भारतीय मराठीसाहित्य महामंडळातर्फे घेण्यात आला होता. त्यानुसार चार घटक संस्थांकडून प्रत्येकी तीन नावे, संलग्न आणि समाविष्ट संस्थांकडून प्रत्येकी एक आणि विद्यमान संमेलनाध्यक्षांकडून एक अशी नावे मागवण्यात आली होती. यामध्ये मराठवाडा साहित्य परिषदेने नावे माघारी घेतल्याने त्या नावांचा विचार केला गेला नाही. इतर नावांबाबत चर्चा झाल्यावर बहुमताने डॉ. अरुणा ढेरे यांची निवड झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)