ज्येष्ठ मातांचे आई फाउंडेशनच्या गौरव

देहूरोड, (वार्ताहर) – श्री संत तुकाराम महाराजांचे अंभग, भगवंत राम, कृष्ण, भक्‍त पुंडलिक यांच्या महिमेमध्ये आईचे कष्ट, माया सांगितले जाते तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या माता जिजाऊ आहेत. सावित्रीबाई फुले यांचे उदाहरण देत आईची मंहती व्यक्त करीत, 21 व्या शतकात जातीच्या नावाखाली राजकारण करणारी काही मंडळी असताना आई फाउंडेशन राबविलेल्या जातीय पलीकडील समता व महिलांचा आदर या उपक्रमास साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी शुभेच्छा व्यक्‍त केले.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन आई फाउंडेशनच्या वतीने देहुतील श्री शिवाजी चौक येथे आई पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. चंद्रभागा पुनाजी चव्हाण यांना जिजाऊ पुरस्कार, तर सुभद्रा सोपान काळोखे यांना भिमाई पुरस्कार डॉ. मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच काश्‍मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवासाने “बेटी बचाव, देश बचाव’चा संदेश देणारी पूजा बुधावले, ग्रामपंचायतीच्या 14 सफाई कर्मचारी यांचे आरोग्यदूत पुरस्कार म्हणून तुकाराम चिखले आणि देहु कॉंग्रेसच्या महिलाध्यक्षपदी वनीता देशकर हिची निवड झाल्याने सन्मानीत करण्यात आले.
या वेळी पंचायत समिती सदस्या हेमलता काळोखे, देहुचे सरपंच उषा चव्हाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अतुल काळोखे, मुस्लीम को-ओ बॅंकेचे जंगबहादुर राव, मधुकर कंद, माऊली काळोखे, अभिमन्यु काळोखे, बाळासाहेब काळोखे, अशोक मोरे, फाउंडेशनचे अध्यक्ष रुपेश चव्हाण, सुनील कुडस्कर, सोमनाथ देशकर, कैलास काळोखे आदी व्यासपीठावर उपस्थीत होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे शंकर घनवट, लक्ष्मण खुटेकर, पंकज चव्हाण, किशोर कुलकर्णी, मयुर घनवट आदीनी परीश्रम घेतले. उमेश टिजगे यांनी सुत्रसंचलन केले. रशीद धोंडफोडे यांनी प्रस्ताविक केले. चव्हाण यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)