ज्येष्ठ पत्रकारांना अर्थसहाय्य – मुख्यमंत्र्यांची ग्वाही

फलटण – शासकीय अधिस्विकृतीधारक ज्येष्ठ पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतून लवकरच निश्‍चितपणे अर्थसहाय्य सुरु केले जाईल. तसेच नव्याने प्रसारीत झालेल्या शासकीय संदेश प्रसार नियमावलीमधील वृत्तपत्रांच्या पडताळणीतील जी.एस.टी.बाबतच्या नियमातून लघु वृत्तपत्रांना वगळण्याबाबत निश्‍चितपणे सकारात्मक कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे तथा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी ना.देवेंद्र फडणवीस यांची शिरवळ येथील हेलीपॅडवर भेट घेवून वरील मागण्यांबाबत निवेदनाद्वारे लक्ष वेधले. त्यावर मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही प्रश्‍नांबाबत लवकरात लवकर निश्‍चित कार्यवाही करु असे आश्‍वासन दिले.
यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय शिवतारे, आ.शंभुराज देसाई, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे संचालक ऍड.रोहित अहिवळे, फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाचे सचिव रोहित वाकडे, कार्यकारिणी सदस्य चैतन्य रुद्रभटे, प्रसन्न रुद्रभटे उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान,शासकीय संदेश प्रसार नियमावलीनुसार वृत्तपत्रांना जाहीर केलेल्या जाहिरात दरवाढीबद्दल मुख्यमंत्र्यांचे रविंद्र बेडकिहाळ यांनी अभिनंदनही केले. तसेच शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या दहा दर्शनी जाहिरातींमध्ये संविधान दिन दि.26 नोव्हेंबर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दि.3 जानेवारी या दोन अभिवादनपदर जाहिरातींचा जादा समावेश करावा, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)