ज्येष्ठ नेते चंदुकाका जगताप यांचे निधन

पुरंदरच्या विकासात मोठा वाटा असलेला नेता हरपला 

सासवड – सासवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष चंदुकाका जगताप यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले. मृत्युसमयी ते 70 वर्षांचे होते. आजारामुळे गेली कित्येक दिवस ते रुग्णालयातच होते, त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. सासवडच्या माजी नगराध्यक्षा आणि नगरपरिषदेच्या गटनेत्या आनंदिकाकी जगताप या त्यांच्या पत्नी होत तर पुणे स्मार्ट सिटीचे सीईओ राजेंद्र जगताप आणि पुणे जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप हे त्यांचे चिरंजीव तर राणी व सोनल या दोन कन्या होत. माजी वनमंत्री पतंगराव कदम हे त्यांचे व्याही आहेत.

चंदुकाका जगताप यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण पुरंदर तालुक्‍यावर शोककळा पसरली. सकाळी 7:00 वाजता त्यांचे पार्थिव सासवड मध्ये आणण्यात आले. पुरंदर मधील नागरिकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. आज, सोमवार सासवडचा बाजाराचा दिवस असतानाही सर्व व्यापारी संघटना, मेडिकल, किराणा, भुसार, कापड, सोने- चांदी, हॉटेल आणि सर्वच व्यवसायकांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवली. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ आज बंद ठेवण्यात आली.

ज्येष्ठ नेते चंदुकाका जगताप यांनी अत्यंत कष्टातून आणि गरिबीतून मोठी प्रगती केली होती. सासवड मध्ये त्यांनी संत सोपानकाका बॅंकेची तर खळद येथे पुरंदर मिल्क या उद्योगाची स्थापना केली. सासवडचे श्री शिवाजी शिक्षण मंडळ आणि पुरंदर नागरी पतसंस्थेचे ते अध्यक्ष होते. तब्बल 12 वर्षे ते नगराध्यक्ष होते. राज्यातील सर्वात गतीने झालेली वीर धरणावरून सासवड मध्ये झालेली 18 कोटींची पाणी योजना त्यांच्याच काळात पुर्ण झाली, त्या बरोबरच सासवड शहराचा कायापालट करण्यात चंदुकाका यांचा मोठा आणि निर्णायक वाटा आहे.

सासवड नगरपरिषदेचे ते 1985 ते 1992 व पुन्हा 2002 ते 2007 या काळात ते नगराध्यक्ष होते. 1985 पासून ते आजपर्यंत सलग 7 वेळा पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक होते. 2004 मध्ये 7 महिन्यांसाठी पुणे स्थनिक स्वराज्य मतदार संघातून ते विधान परिषदेवर निवडून गेले. तर 2008 मध्ये तीन वर्षांसाठी राज्य सहकार परिषदेचे (मंत्री दर्जा) अध्यक्ष होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)