ज्येष्ठ नागरीक संघ त्रिवेणीनगरतर्फे गुणगौरव, सन्मानपत्र प्रदान सोहळा

निगडी- ज्येष्ठ नागरीक संघ त्रिवेणीनगरच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि उद्योजक प्रभाकर धनोकार “सन्मानपत्र प्रदान’ सोहळा संपन्न झाला. यावेळी संघाचे अध्यक्ष प्रभाकर धनोकार, कार्याध्यक्ष रघुनाथ भालेकर, सरचिटणीस रमेश फाटके उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयंत कड होते. तसेच नगरसेवक प्रविण भालेकर, नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, आवर्जून उपस्थित होते. यावेळी ज्ञानदीप शाळेचे माजी अध्यक्ष बाजीराव गारगोटे यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. यावेळी दहावी व बारावीमध्ये यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उद्योजक प्रभाकर धनोकार यांचा औद्योगिक व सामाजिक कार्यांसाठी सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाराम सावंत यांनी केले तर सर्जेराव पोळ यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)