ज्येष्ठ नागरिक समाजाचे आधारसंतभ – ऍड. नवनाथ निघोट

मंचर- ज्येष्ठ नागरिक समाजाचे आधारस्तंभ आहेत; परंतु अलिकडची तरुणाई त्यांचे म्हणणे समजून घेत नाहीत. गावविकासाठी ज्येष्ठ नागरिकांचे मोठे योगदान आहे. हे तरुणांनी विसरुन जाऊ नये, असे आवाहन प्रसिद्ध कायदेतज्ञ ऍड.नवनाथ निघोट यांनी केले.

निघोटवाडी (ता. आंबेगाव) येथे ज्येष्ठ नागरिक संघाची कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी निघोट, सरपंच नवनाथ निघोट, ऍड. नवनाथ निघोट यांच्या उपस्थितीत स्थापना करण्यात आली. यावेळी उपसरपंच वर्षा निघोट, दशरथ भालेराव, काशिनाथ वळसे पाटील, आयुष इनामदार, सोपान नवले, सूर्यकांत थोरात, अरुण बाणखेले, रंगनाथ थोरात, वि. श. महामुनी यांच्यासह महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

बाजार समितीचे संचालक शिवाजी निघोट म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांसाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. ज्येष्ठांनी आरोग्य सांभाळून समाज सदृढ केला पाहिजे. सरपंच नवनाथ निघोट म्हणाले की, ज्येष्ठांसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध योजना राबविल्या जातील. तसेच सहकार्य केले जाईल. प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक राजाराम निघोट यांनी केले. सूत्रसंचालन संघाचे सचिव दशरथ निघोट यांनी केले तर सचिन निघोट यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)