ज्येष्ठ नागरिक संघाचा तहसील कार्यालयावर मोर्चा

राहाता – साठपेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना शासनाने सर्व शासकीय योजनांचा फायदा द्यावा, या मागणीसह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेसकॉम) व एकरुखे येथील संत तुकाराम ज्येष्ठ नागरिक संघांच्या वतीने राहाता तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे, की शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण कारागीर तसेच 60 पेक्षा जास्त वय असणाऱ्या दारिद्रयरेषेखालील मजुरांना शासनाने पाच हजार रुपये निवृत्ती वेतन द्यावे. श्रावणबाळ वार्धक्‍य निवृत्ती वेतनात सहाशे रुपयांऐवजी दोन हजार रुपये निवृत्ती वेतन द्यावे. ज्येष्ठ नागरिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची पुरवणी अंदाजपत्रकात तरतूद करावी, ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामूल्य आरोग्य विमा योजना त्वरीत चालू करावी व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आयुक्तालय सुरू करावे आदी मागण्या तातडीने मान्य कराव्यात.
एकरुखे येथील संत तुकाराम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील चौधरी यांच्या नेतृत्त्वाखाली शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी मोर्चा नेला. नायब तहसीलदार अभिजीत बारवकर यांना निवेदन दिले. या वेळी गंगाधर पाटील र्चाधरी, रामभाऊ मुजमुले, वाकडी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शंकरराव पाटील लहारे, ह.भ.प. चंद्रभान महाराज चौधरी आदींनी मनोगते व्यक्त केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)