ज्येष्ठ नागरिक धोरणाची जबाबदारी उपायुक्तांकडे

पुणे – ज्येष्ठ नागरिक धोरण सक्षमपणे राबविण्यासाठी महानगरपालिकेने उपायुक्त अथवा सहायक आयुक्त यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात यावी. तसेच दर दोन महिन्यांनी या योजनेचा आढावा घेऊन त्याचा अहवाल नगरविकास विभागाला सादर करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा, अशी तरतूद आहे. ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता, त्यांचा वृद्धापकाळ चांगल्या पद्धतीने घालविता यावा, समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांचे शारिरीक व मानसिक आरोग्य चांगले राहावे. वृद्धापकाळामध्ये त्यांची आर्थिक क्षमता, कामाचा हक्‍क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिक धोरण 2013 ची अंमलबजावणी करण्याचे निश्‍चित केले आहे.

नगरविकास विभागांतर्गत सर्व महानगरपालिका, नगरपालिका यांना ज्येष्ठ नागरिक धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. महानगरपालिकेने त्यांच्या आस्थापनेवरील एक उपायुक्त यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात यावी. त्यांचे नाव, पदनाम, कार्यालयीन दूरध्वनी, मोबाईल क्रमांक शासनास सादर करण्यात यावा. तसेच नगरपालिकांमध्ये या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्याधिकारी यांच्यावर ही जबाबदारी निश्‍चित केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)