काळेवाडी – ज्येष्ठ नागरिक आणि माजी सैनिकांच्या विविध मागण्यांसाठी एकत्रितपणे संघटन निर्माण करून आगामी काळात काम करण्याचा निर्णय काळेवाडी येथे ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिक संघांच्या अध्यक्षांच्या बैठकीत घेण्यात आला.
माजी सैनिक व ज्येष्ठ नागरिक जन आंदोलन कृती समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या संस्थापक अध्यक्षपदी लक्ष्मण रुपनर यांची निवड करण्यात आली. ही समिती महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिकांचे संघटन उभारणार आहे.
रुपनर यांनी आतापर्यंत ज्येष्ठ नागरिक सेलच्या माध्यमातून माजी सैनिकांना सामान्य करात सवलत आणि ज्येष्ठांना वैद्यकीय सुविधा, एस.टी., पीएमपीएल, विमान, रेल्वे प्रवासात सवलत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला आहे. नवीन कृती समितीत अधिकाधिक ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन लक्ष्मण रुपनर यांनी केले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा